। लोकजागर वृत्त । साखरवाडी । १३ ऑक्टोबर २०२६ ।
साखरवाडी (तालुका फलटण) येथे श्रीदत्त इंडिया कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गाळप हंगामाच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विद्वांस श्याम सुंदरशास्त्री, श्रीदत्त इंडियाच्या चेअरमन प्रीती रूपारेल आणि संचालक जितेंद्र धारू यांच्या हस्ते तसेच कंपनीचे संचालक चेतन धारू, परीक्षित रुपारेल व करन रुपारेल यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. आगामी हंगामात उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट असून यासाठी लागणारी तोडणी व वाहतूक यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शासन निर्णयानुसार गळीत हंगाम सुरू करण्यात येणार असून एनसीएलटीच्या माध्यमातून ७ वर्षांपूर्वी घेतलेल्या कारखान्याच्या विस्तारवाढीचे काम आता पूर्ण झाले आहे. पूर्वीचा ३ हजार ५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला हा कारखाना यावर्षी विस्तारवाढ झाल्याने पूर्ण क्षमतेने ऊसाचे गाळप करणार आहे. यामुळे तालुक्यातील व तालुक्याबाहेरील कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप वेळेत होण्यास मोठी मदत होणार असल्याचे कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी यावेळी सांगितले. श्रीदत्त इंडिया ही कंपनी अल्पावधीत शेतकऱ्यांना उसाच्या चोख पेमेंटमुळे पसंतीस उतरली असून शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, व्हाईस प्रेसिडेंट भारत तावरे, चांगदेव साळवी, टेक्निकल युनिट हेड अमोद पाल, केन मॅनेजर सदानंद पाटील, दिगंबर माने, रमेश बागणवर, एच आर संजय भुसनार, नितीन नाईकनवरे, डीजीएम अजित कदम, डेप्युटी चीफ इंजिनियर किशोर फडतरे, नितीन रणवरे, विशाल साखरे, नितीन होले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पोपट भोसले, संतोष भोसले, महेश भोसले, राजेंद्र गायकवाड, केन यार्ड इनचार्ज एस. के. भोसले, ट्रान्सपोर्ट इनचार्ज नितीन भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, सुरक्षा अधिकारी अजय कदम, सुरेश भोसले, संजय जाधव, मातोश्री कन्स्ट्रक्शनचे संजय भोसले, जयराम भोसले, सुरेश भोसले यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी, कामगार व ऊसउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
