माढा लोकसभा मतदारसंघातील भीषण दुष्काळावर तोडगा काढण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सक्रीय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत घेतली भेट

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती; दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा.

। लोकजागर वृत्त । मुंबई । १९ ऑक्टोबर २०२६ ।

सध्या राज्यात आणि विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीवेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Spread the love