‘आदर्श’ क्लासच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. २५ फेब्रुवारी २०२५ ।

कोळकी (ता.फलटण) येथील राजेंद्र भिवरकर यांच्या आदर्श क्लासच्या स्कॉलरशिप आणि मंथन परिक्षेच्या सन २०२४ – २५ च्या बॅचचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.

यावेळी नाईकबोमवाडीचे प्राचार्य बापूराव सोनवलकर, माजी सैनिक महेंद्र वाघ, कराटे शिक्षक रविंद्र सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर राजेंद्र भिवरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात २० मे २०२४ पासूनचा क्लासचा प्रवास नमूद केला. एकूण २५०० इंग्रजी शब्दार्थ, ६० सराव परीक्षा, वाचन उपक्रम, लेखन उपक्रम, निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम वर्षभरात क्लासमध्ये घेण्यात आल्याचे सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य बापूराव सोनवलकर यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासो महत्त्व विषद करुन पेपर कसा सोडवावा याविषयी मार्गदर्शन केले. तर महेंद्र वाघ यांनी जीवनात अभ्यासाबरोबरच शिस्त किती महत्त्वाची आहे हे सांगितले.

क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला प्रवास नमूद करुन भिवरकर यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले. उपस्थित पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करुन क्लासच्या उपक्रमांबद्दल कौतुक करुन मुलांना पाठवण्याचा निर्णय योग्य ठरला असल्याचे सांगितले.

Spread the love