। लोकजागर । फलटण । ४ मे २०२६ ।
श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मित्र मंडळाचे मार्गदर्शक सिकंदर बागवान यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटणमधील सामाजिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.
सिकंदर बागवान यांनी महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्षे मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून (धनगरवाडा, फलटण) निघणार आहे.
