हणमंतराव पवार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विडणीत शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश व नेत्र तपासणी

कुक्कुटपालन संस्था व लायन्स क्लबचा पुढाकार; विद्यार्थ्यांना मोफत चष्मे व साहित्याचे वाटप.

। लोकजागर वृत्त । फलटण । ३० जुलै २०२६ ।

हणमंतराव पवार यांच्या २९ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून मांगोबा माळ विडणी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले. तसेच या प्रसंगी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून गरजूंना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. हणमंतराव दिनकरराव पवार सहकारी कुक्कुटपालन संस्था मर्यादित फलटण आणि लायन्स क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी हणमंतराव दिनकरराव पवार सहकारी कुक्कुटपालन संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक दिलीपसिंह भोसले, व्हाईस चेअरमन मानाजीराव चव्हाण, संचालक ॲड. सौ. मधुबाला भोसले, राजाराम पवार, राजाराम फणसे, राजस भोईटे, स्वाती फुले आणि तुषार गांधी यांनी उपस्थिती लावून उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल विडणी परिसरातील ग्रामस्थ, शाळा प्रशासन आणि पालकांनी आयोजकांचे आभार मानले.

Spread the love