मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांचे संचलन, संगीत कवायत व देशभक्तीपर गीतांनी जिंकली मने; गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार.

। लोकजागर वृत्त । फलटण । १५ ऑगस्ट २०२६ ।

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण प्रशालेत स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा समितीच्या चेअरमन वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या वेळी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेले संचलन, संगीत कवायत आणि देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शालेय परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता. या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिताराणी कुमार कुचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला निमंत्रित सदस्य निर्मला रणवरे, माजी नगरसेवक किशोर सिंह नाईक निंबाळकर, मुधोजी बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका रजपूत, नवीन प्राथमिकच्या मुख्याध्यापिका गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love