जनावरांना चारा व मुलांना वही-पेन वाटप; विविध राजकीय, सामाजिक नेते व पत्रकारांची प्रमुख उपस्थिती.
। लोकजागर वृत्त । फलटण । १६ ऑगस्ट २०२६ ।
सातारा येथील उद्योजिका अस्मिता विशाल पाटील यांच्या कल्पकतेतून निर्माण झालेल्या ‘देवत्व बेकर्स’च्या फलटण शाखेला १५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. देवत्व बेकर्सचा मावा केक आज संपूर्ण सातारा जिल्ह्यासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांची पहिली पसंती ठरला असून “चव आईच्या प्रेमाची” ही ओळख निर्माण केली आहे. फलटण शाखेच्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून जनावरांना चारा आणि शालेय मुलांना वही व पेन वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता ‘भक्ती एंटरप्रायजेस व अश्विनी लेडीज शॉपी, बुरुड गल्ली, पेंढारकर इलेक्ट्रॉनिक शेजारी, फलटण’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपकराव चव्हाण, के. बी. ग्रुप ऑफ कंपनी फलटणचे संचालक सचिन यादव, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब चोरमले, देवत्व बेकर्सचे चेअरमन विशाल पाटील, उद्योजिका अस्मिता विशाल पाटील, विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, सामाजिक कार्यकर्ते आमीर भाई शेख, शिक्षण मंडळाचे माजी सभापती किशोर तारळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसेच पत्रकार बंधू अरविंद मेहता, सुभाषराव भांबुरे, पोपटराव मिंड, बापूराव जगताप, चेअरमन सुधीर अहिवळे, अजय माळवे, ॲड. रोहित अहिवळे, सचिन मोरे, शक्ती भोसले, नसीर शिकलगार, युवराज पवार, प्रशांत रणवरे, सागर चव्हाण आणि वैभव जगताप यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन वैशाली अर्जुन शिंदे, अर्जुन सीताराम शिंदे, रुपाली वैभव शेंडे, वैभव यशवंतराव शेंडे, भारती यशवंत खलाटे (पाटील), यशवंत भीमराव खलाटे (पाटील), विशाल यशवंतराव शेंडे, ऋषिकेश अर्जुन शिंदे, श्रेयश वैभव शेंडे आणि प्रथमेश यशवंत खलाटे (पाटील) यांच्या वतीने करण्यात आले आहे. सातारा, फलटण, निरा आणि नातेपुते येथे देवत्व बेकर्सच्या शाखा विस्तारल्या असून या वर्धापनदिन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
