हर्षल पडळकर व आरती माळवे यांची चमकदार कामगिरी; धुळदेव परिसराकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक.
। लोकजागर वृत्त । फलटण । १८ ऑगस्ट २०२६ ।
रयत शिक्षण संस्था संचलित धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव येथील विद्यार्थ्यांनी ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाची मान उंचावली आहे. या परीक्षेत हर्षल हणुमंत पडळकर (२२६ गुण) आणि आरती दिपक माळवे (२२० गुण) यांनी उत्कृष्ट यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यालयाचे एकूण ५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख अभंग एस. बी., गावडे ए. पी. आणि लव्हाटे एस. एल. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक मोरे व्ही. ए., स्कूल कमिटी सदस्य तसेच धुळदेव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालकवर्ग आणि शिक्षकवृंदाकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
