मुधोजी ज्युनियर कॉलेजची निकालाची परंपरा कायम; बारावी परीक्षेत मुलींची बाजी

विज्ञान शाखेचा निकाल ९९.२७ टक्के; फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक.

। लोकजागर । फलटण । ५ मे २०२६ ।

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या इयत्ता बारावी (HSC) बोर्ड परीक्षेत आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा याही वर्षी जपली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे.

निकालाची आकडेवारी: यावर्षी मुधोजी ज्युनियर कॉलेजमधून तिन्ही शाखांमिळून एकूण ७१७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाखानिहाय निकाल खालीलप्रमाणे आहे:

  • विज्ञान शाखा: ४१२ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ४०९ उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९९.२७% इतकी आहे.
  • कला शाखा: ९३ विद्यार्थ्यांपैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८८.१७% लागला आहे.
  • वाणिज्य शाखा: २१२ विद्यार्थ्यांपैकी १७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८३.४९% लागला आहे.

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी (Distinction) मिळवली, तर १८३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी:

  • कला शाखा: प्रथम- यशराज मदने (७९.८३%), द्वितीय- अंजली कदम (७३.८३%), तृतीय- सई चव्हाण (७३.१७%).
  • वाणिज्य शाखा: प्रथम- अश्विनी नेवसे (९०.८३%), द्वितीय- प्रणिता कांबळे (८६.८३%), तृतीय- पूनम कचरे (८२.१७%).
  • विज्ञान शाखा: प्रथम- सिद्धांत साळुंखे (८९.३३%), द्वितीय- सई सुर्वे (८५.३३%), तृतीय- संस्कृती फरांदे (८४.८३%).

मान्यवरांकडून अभिनंदन: विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

तसेच संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य सोमनाथ माने, ए. वाय. ननवरे आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love