फलटणमध्ये आज आणि १६ मे रोजी पुन्हा ‘आधार कार्ड’ शिबिराचे आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

। लोकजागर । फलटण । ८ मे २०२६ ।

फलटण शहरातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेता, नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांनी आधार कार्ड शिबीर पुन्हा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या नागरिकांना काही कारणास्तव अद्याप नवीन आधार कार्ड काढणे किंवा जुन्या कार्डमध्ये आवश्यक बदल करणे शक्य झाले नाही, त्यांच्या सोयीसाठी हे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

नियोजनानुसार, हे शिबीर आज शनिवार दिनांक ९ मे २०२६ आणि शनिवार दिनांक १६ मे २०२६ अशा दोन सलग शनिवारी संपन्न होणार आहे. हे दोन्ही दिवस सकाळी १० वाजल्यापासून नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे कामकाज चालणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून नवीन आधार कार्ड काढणे, पत्ता बदलणे, मोबाइल नंबर अपडेट करणे किंवा इतर दुरुस्त्या करणे यांसारख्या सेवा नागरिकांना त्यांच्या प्रभागातच उपलब्ध होणार आहेत.

शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन कु. सिद्धाली शहा यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक असल्याने, नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Spread the love