नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे शहरातील व्यापारी व दुकानदारांना निर्देश.
। लोकजागर वृत्त । फलटण । ६ ऑगस्ट २०२६ ।
फलटण शहरातील सर्व व्यापारी व दुकानदार यांना सूचित करण्यात येते की, सोमवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी नागपंचमी सण असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. त्या कामासाठी सर्रास चायनीज व नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने नागरिकांच्या व पशुपक्ष्यांच्या जिवास धोका निर्माण होत आहे.
त्यामुळे शहरातील दुकानदार, गाळेधारक व घरामध्ये पतंग व मांजा विक्री करणाऱ्यांकडे चायनीज अथवा नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास दुकान परवाना रद्द करण्यात येईल व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा कडक इशारा फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (गट-अ) निखिल जाधव यांनी दिला आहे.
