चायनीज मांजामुळे झाडावर अडकलेल्या ‘गव्हाणी घुबडाला’ जीवनदान; मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमची तत्परता!

तहसीलदार कार्यालयामागील घटना; नॅचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीकडून बास्केटबॉल टीमचे आभार.

। लोकजागर वृत्त । फलटण । ७ ऑगस्ट २०२६ ।

पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जीवघेण्या चायनीज मांजामुळे ‘गव्हाणी घुबड’ (Barn Owl) झाडावर अडकल्याची घटना घडली. तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस अधिकार ग्रह येथे हा प्रकार घडला असून, झाडावर अडकलेल्या या घुबडाची सुटका करून त्यास सुरक्षितपणे जीवनदान देण्यात आले आहे.

या घुबडास मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमकडून जीवनदान देण्यात आले असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल ‘नॅचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी, फलटण’ यांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. चायनीज मांजा अजून किती जीवितहानी करेल? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला असून, सर्वांनी आपापल्या सभोवताली असलेल्या परिसरात लहान मुलांना आणि तरुणांना प्रबोधन करावे, जेणेकरून ही जीवितहानी थांबेल, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Spread the love