संदीपकुमार जाधव यांची भारतीय पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड

। लोकजागर । फलटण । दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ।

येथील पत्रकारितेसह शिक्षण, सामाजिक, कला, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील कार्यक्षम व्यक्तीमत्त्व असलेले संदीपकुमार जाधव यांची भारतीय पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र या पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष एम.एस.शेख व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष एस.बी. नदाफ यांनी जाधव यांना दिले आहे.

संदीपकुमार जाधव यांची ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र नेरकर, महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्ष पल्लवी प्रकाशकर, एम.एस.शेख, एस.बी.नदाफ, लिगल विंगचे प्रदेशाध्यक्ष कैलास पठारे, प्रदेश संघटक अनिल सोनवणे, पुणे विभागीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Spread the love